युडायस कोड :- 27090407002
शाळेची स्थापना १९९२ रोजी करण्यात आली शाळेचे संस्थापक स्व. श्री. धनराजजी उलमाले यांनी शाळेची स्थापना केली शाळेची स्थापना श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळ उमरी (भ.) या संस्थेमार्फंत करण्यात आली या संस्थेच्या दोन शाळा आहेत एक शाळा श्रीकृष्ण विद्यालय खुर्सापार येथे व दुसरी शाळा श्रीकृष्ण विद्यालय मंगसा या गावी आहेत हे गाव सावनेर ते छिंदवाडा रोडवर जी.टी.एन. कंपनी पासून २ किलोमीटर दूर आहे.
या शाळेत एकूण दहा शिक्षक आहेत चार कर्मचारी आहेत विद्यार्थी संख्या एकूण २३३ आहे. येथे ५ ते १० पर्यंत वर्ग आहेत शाळेची वेळ सोमवार ते शुक्रवार
१० ते ५ असते आणि शनिवारी शाळेची वेळ सकाळी ७.३० वाजता असते.